Sun, Apr 21, 2019 05:51होमपेज › Soneri › विवाहित अभिनेत्रीच्‍या प्रेमात होते आशुतोष राणा 

विवाहित अभिनेत्रीच्‍या प्रेमात होते आशुतोष राणा 

Published On: Nov 09 2018 1:04PM | Last Updated: Nov 09 2018 1:10PMबर्थडे स्‍पेशल 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड इंडस्ट्रीला 'जख्म', 'दुश्मन' आणि 'संघर्ष' यासारखे एकापेक्षा एक चित्रपट देणारे अभिनेते आशुतोष राणा यांचा आज ५० वा वाढदिवस.  आशुतोष वेगळ्‍या भूमिका करणारे अभिनेते म्‍हणून ओळखले जातात. 

Image result for ashutosh rana

टीव्‍ही मालिका 'स्वाभिमान'मधून आपल्‍या करिअरची सुरुवात करणारे आशुतोष मध्य प्रदेशचे राहणारे आहेत. चित्रपट 'दुश्मन'मध्‍ये सायको किलरची भूमिका साकारून त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली. 

इंडस्ट्रीला 'जख्म', 'दुश्मन', 'संघर्ष' असे एकापेक्षा एक चित्रपट दिले. 

Related image

आशुतोष शिवभक्त आहेत. त्‍यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते, ते त्‍यांच्‍या गुरूंच्‍या म्‍हणण्‍यानुसार, सिनेजगतात आले होते. 

त्‍यांनी आतापर्यंत ३० हून अधिक चित्रपट आणि टीव्‍ही मालिकांमध्‍ये काम केलं आहे. 

Related image

आशुतोष यांच्‍या आयुष्‍यात असा एक दिवस आला होता की, ज्‍यावेळी त्‍यांना एका चित्रपटाच्‍या सेटवरून बाहेरचा रस्‍ता दाखवण्‍यात आला होता. आशुतोष यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा ते चित्रपट निर्माते-दिग्‍दर्शक महेश भट्ट यांना भेटायला गेले होते. भारतीय परंपरानुसार, त्‍यांनी महेश भट्ट यांचे आशीर्वाद घेतले. त्‍यानंतर महेश भट्‍ट भडकले. कारण, पाया पडणारे व्‍यक्‍ती त्‍यांना आवडत नाहीत. त्‍यावेळी महेश भट्‍ट यांनी सेटवरून आशुतोष यांना बाहेरचा रस्‍ता दाखवला. इतकचं नाही तर ते 'हा व्‍यक्‍ती सेटवर कसा आला?' असं म्‍हणत सहाय्‍यक दिग्‍दर्शकावर देखील संतापले होते. इतक्‍या अपमानानंतर देखील हार मानली नाही. ज्‍या-ज्‍यावेळी ते महेश भट्ट यांना भेटायचे किंवा पाहायचे, त्‍यांचा आशीर्वाद घ्‍यायचे. अखेर महेश भट्ट यांनी एक दिवस त्‍यांना विचारलं की, मला पाया पडणे आवडत नसतानाही तू असं का करत आहेस? 

Related image

त्‍यानंतर आशुतोष म्‍हणाले, 'मोठ्‍या लोकांचा आशीर्वाद घेण्‍यात संस्कार आहेत. हे संस्‍कार मी सोडू शकत नाही.' त्‍यावेळी महेश भट्ट यांनी आशुतोष यांची गळाभेट घेतली आणि टीव्‍ही मालिका 'स्वाभिमान'मध्‍ये गुंडाची भूमिका दिली. ही आशुतोष यांची पहिलीच भूमिका होती. नंतर आशुतोष यांनी महेश भट्ट यांच्‍यासोबत अनेक चित्रपटात काम केलं. त्‍यामध्‍ये 'जख्म', 'दुश्मन' हे महत्त्‍वाचे चित्रपट आहेत. 

आशुतोष राणा एनएसडीचे विद्‍यार्थी होते. एलएलबीनंतर ते वकील होणार होते. प्रशिक्षणानंतर त्‍यांना एनएसडीमध्‍ये नोकरीची ऑफर मिळाली. परंतु, त्‍यांनी सिनेजगतात येण्‍याचा निर्णय घेतला.  

Image result for ashutosh rana

शूटिंगमध्‍ये कितीही बिझी असले तरी जेव्‍हा त्‍यांचे गुरु सव्‍वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण महारुद्र यज्ञासाठी बोलावल्‍यानंतर आशुतोष हातातली सर्व कामे सोडून जातात. 

रेणुका शहाणेसोबत विवाह

dinsta

अभिनेत्री रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट चित्रपट 'जयति'च्‍या शूटिंगवेळी झाली होती. त्‍यानंतर अनेक महिने दोघांच्‍यात कुठलीही चर्चा झाली नाही. ऑक्टोबर १९९८ मध्‍ये आशुतोष यांनी रेणुकाला फोन करून दिवाळीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यानंतर दोन-तीन दिवसांनी त्‍यांनी रेणुकाला फोन केला. एक दिवस रेणुकाने आशुतोष यांना फोन केला आणि १ तास बोलली. त्‍यानंतर ३ महिने दोघेही फोनच्‍या माध्‍यमातून बोलत होते. रेणुका यांचं लग्‍न फार काळ टिकलं नव्‍हतं. ही गोष्‍ट आशुतोष यांना माहिती होती. तरीही त्‍यांनी रेणुकाशी विवाह करण्‍याचा निर्णय घेतला.

dinsta

आता या जोडीला शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत.

dinsta

dinsta