Fri, Jan 24, 2020 05:06
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › गर्लफ्रेंडला मारहाण, अरमान कोहलीला अटक 

गर्लफ्रेंडला मारहाण, अरमान कोहलीला अटक 

Published On: Jun 13 2018 12:25PM | Last Updated: Jun 13 2018 12:25PMमुंबई : पुढारी ऑनलाईन  

'बिग बॉस'मुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता अरमान कोहलीने आपल्‍या गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी अरमानला मुंबई पोलिसांनी अरमान कोहलीला अटक केली आहे. अरमानविरोधात त्‍याची गर्लफ्रेंड नीरू रंधावाने सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्‍ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल केला होता. 

अरमानचा गर्लफ्रेंड नीरू रंधावासोबत पैशांच्या देवाणी-घेवाणीवरून वाद झाला होता. या वादातूनच आरमानने तिला मारहाण केली. या मारहाणीत ती जखमी झाल्‍याने तिला अंधेरीतील कोकीलाबेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले होते. 

रिपोर्ट्सनुसार, नीरू आणि अरमान २०१५ पासून रिलेशनशिपमध्‍ये होते.