Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › Soneri › कमकुवत ह्रदयाच्या लोकांनी हा चित्रपट पाहु नका!

कमकुवत ह्रदयाच्या लोकांनी हा चित्रपट पाहु नका!

Published On: Nov 15 2017 11:10AM | Last Updated: Nov 15 2017 11:10AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भयपट पाहणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी मिळणार आहे. Insidious: The Last Key या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवरची टॅगलाईनच मनात भिती निर्माण करते. हा चित्रपट तुम्हाला शांत करण्यापूर्वी तुम्ही ओरडा, किंचाळा असे टॅगलाईनमध्ये म्हटले आहे.

हॉलीवूडची सुपरहिट भयपटांच्या इनसिडियस या मालिकेती चौथा चित्रपट तयार झाला आहे. Insidious: The Last Key असे या चित्रपटाचे नाव आहे. भयपटांच्या मालिकेतील पहिले तिन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले होते. ‘द लास्ट की’ मध्ये डॉ.एलिस रेनियरची भूमिका लिन शाय पार पाडणार आहे. या चित्रपटात ते पॅरासायकॉलॉजिस्टच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याच घराला धोका निर्माण झाला आहे. भूत-प्रेतांची नजर त्यांच्याच परिवारावर असल्याचे या चित्रपटात दाखण्यात आले आहे. या अगोदरच्या भागात इतर लोकांना भूत-प्रेतांपासून वाचवले आहे. आता स्वत:च्याच लोकांना त्यांना वाचवायचे आहे.

‘इनिसिडियस : द लास्ट की’ हा चित्रपट जेम्स वॅन ने दिग्दर्शित केला आहे. या अगोदर जेम्सने कॉन्ज्युरिंग आणि इनसिडियस च्या प्रत्येकी दोन भागांचे दिग्दर्शन केले होते. इनसिडियस लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्याच्या ट्रेलर आणि पोस्टरर्सवरुन भयपटाची उत्सुकता वाढवण्याचे काम केले आहे.