Sat, Jul 04, 2020 12:08होमपेज › Soneri › सुशांतचे ट्विट डिलीट कुणी केले, पोलिसांचा प्रश्न

सुशांतचे ट्विट डिलीट कुणी केले, पोलिसांचा प्रश्न

Last Updated: Jun 30 2020 3:54PM

(photo - sushantsinghrajput_f.c insta)नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. ट्विटरवरून सुशांतच्या डिलीट झालेल्या ट्विट्सची माहिती घेण्यासाठी हे पत्र लिहिण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी ट्विटर इंडियाला सुशांत सिंह राजपूतचे ट्विटर हँडल @ItsSSR शी संबंधित डिटेल्स मागितले आहेत. 

पोलिस सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली, यामागील कारण शोधण्यासाठी तपास करत आहे. तपासात ही माहिती समोर आली होती की, सुशांत सिंह राजपूतने गळफास घेण्यासाठी बाथरोब बेल्टचा वापर केला होता. परंतु, तो बेल्ट फाटला. नंतर त्याने आत्महत्या करण्यासाठी हिरव्या रंगाच्या कुर्त्याचा उपयोग केला होता. एक कुर्ता सुशांतचे वजन पेलू शकते का? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कुर्ता कालिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. 

वाचा - सुशांतने आत्महत्येचा दोनवेळा केला प्रयत्न?

पोलिसांना संशय आला जेव्हा रॉब बेल्टचे दोन तुकडे जमिनीवर पडले होते. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी कुर्ता कापून खाली उतरवला होता. एक कुर्ता सुशांतचे वजन पेलू शकतो का नाही, ही माहिती अहवालानंतरच समोर येईल.