Fri, Jan 24, 2020 17:45होमपेज › Soneri › 'केदारनाथ'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; याचिका फेटाळली 

'केदारनाथ'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; याचिका फेटाळली 

Published On: Dec 06 2018 5:04PM | Last Updated: Dec 06 2018 5:04PM
मुंबई :  पुढारी ऑनलाईन 

सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर केदारनाथ चित्रपटाला मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून मिळाला आहे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने या चित्रपटाविरोधात दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी करत चित्रपटावर स्‍थगिती आणण्‍यासंबंधीची याचिका फेटाळली. 

याचिकाककर्त्यांनी न्‍यायालयाकडे मागणी केली होती की, CBFC ने चित्रपटाबाबत पुन्‍हा विचार करावा. धार्मिक स्थळावर जी प्रेमकहाणी दाखवण्‍यात आली आहे. त्‍यामुळे लोकांच्‍या धार्मिक भावना दुखावू शकतात. त्‍याचबरोबर, २०१३ मध्‍ये उत्तराखंडमध्‍ये आलेल्‍या महाप्रलयामुळे केदारनाथच्‍या परिसराचे देखील खूपच नुकसान झाले होते. 

सूत्रांच्‍या माहितीनुसार, 'केदारनाथ' या चित्रपटात सारा अली खान आणि सुशांतसिंह राजपूत यांची प्रेमकहाणी दाखवण्‍यात आली आहे. ही प्रेमकहाणी उत्तराखंडमधील महाप्रलयावर आधारित आहे. त्‍यामुळे लोकांच्‍या धार्मिक भावना दुखवू शकतात, असे याचिकाककर्त्यांनी म्‍हटले आहे. ही याचिका वकील रमेशचंद्र मिश्रा आणि वकील त्रिपाठी यांनी दाखल केली होती. 

'केदारनाथ' ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि त्‍याची एक्स वाईफ अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्‍ये डेब्यू करत आहे. तर 'राब्ता' चित्रपट फ्लॉप झाल्‍यानंतर सुशांत सिंह राजपूत पुन्‍हा एकदा मोठ्‍या पडद्‍यावर आपले नशीब आजमावत आहे. चित्रपटात साराने हिंदू तरुणी तर सुशांतने मुस्लिम तरुणाची भूमिका साकारली आहे. 

सुजैन खान, अर्जुन रामपालने केलं कौतुक

दरम्‍यान, हा चित्रपट रिलीज होण्‍यापूर्वी बालिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईमध्‍ये स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्‍यात आले होते. त्‍यानंतर सर्वांनी सोशल मीडियावरून केदारनाथ चित्रपटाबद्‍दल प्रतिक्रिया दिल्‍या आहेत. अभिनेता अर्जुन रामपाल, ऋतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान आणि शिल्‍पा शेट्‍टीचे पती राज कुंद्रा यांनी देखील 'केदारनाथ'चे कौतुक केले आहे. त्‍याचबरोबर, 'केदारनाथ'चे दिग्‍दर्शक अभिषेक कपूर यांचे कौतुक देखील केले आहे.