Sun, Nov 17, 2019 12:38होमपेज › Soneri › नागराज मंजुळेचा 'नाळ' चित्रपटाचा टिझर (Video)

नागराज मंजुळेचा 'नाळ' चित्रपटाचा टिझर (Video)

Published On: Oct 11 2018 4:19PM | Last Updated: Oct 11 2018 4:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘फँड्री’ आणि ‘सैराट’च्‍या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘नाळ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

मध्‍यंतरी त्‍याने सोशल मीडियावरून एक व्‍हिडिओ शेअर केला होता. त्‍यावरून नागराज मंजुळे पुढचा चित्रपट कुठला आणणार, याची उत्‍सुकता फॅन्‍सना लागून राहिली होती. हा व्‍हिडिओ आटपाट प्रोडक्‍शनच्‍या यू-ट्‍यूब चॅनलवरदेखील अपलोड करण्‍यात आला होता. व्‍हिडिओत 'फँड्री', 'सैराट'चा उल्‍लेख करण्‍यात आला होता आणि शेवटी 'लवकरच...' असा उल्‍लेख करण्‍यात आला होता. हा व्‍हिडिओ नागराज यांनी फेसबुक पेजवरही पोस्‍ट केला होता. या व्‍हिडिओने प्रेक्षकांची उत्‍कंठा वाढली होती. आता नव्‍या व्‍हिडिओवरून रसिकांची ती उत्‍कंठा संपली, असं म्‍हणायला हरकत नाही. 
‘नाळ’ असे या चित्रपटायाचे नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहे. ‘नाळ’ या चित्रपटाचा टीझर फेसबुकवर शेअर करत नागराज यांनी याबाबत माहिती दिली...

‘माझा नवा चित्रपट!!!
माझा पहिला चित्रपट जो मी निर्माण केला नि प्रस्तुत करत आहे. माझा मित्र नि सैराटचा कॅमेरामन सुधाकर रेड्डीने हा दिग्दर्शित केला आहे. माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय. नितीन वैद्य,विराज लोंढे,निखिल वराडकर, प्रशांत पेठे हे या निर्माणातील सोबती आहेतच. मंगेश कुलकर्णी आणि झी स्टुडिओज टीममुळेच हे शक्य होत आहे.’

या चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.