Sat, May 30, 2020 08:50होमपेज › Soneri › मल्टिप्लेक्स असोसिएशनने दिला ‘सेफ्टी प्लॅन’

मल्टिप्लेक्स असोसिएशनने दिला ‘सेफ्टी प्लॅन’

Last Updated: May 22 2020 7:58AM

संग्रहीक छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन काळात मनोरंजनासाठी लोक नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम अशा ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मचा आधार घेत आहेत. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि मल्टिप्लेक्स यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्राद्वारे ‘सेफ्टी प्लॅन’ पाठवला आहे. 

कोरोना महारोगराईमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका मनोरंजन उद्योगालाही बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चित्रीकरण बंद आहेच; पण कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

आयुषमान खुराणा आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘गुलाबो-सिताबो’ आणि विद्या बालन अभिनीत ‘शकुंतलादेवी’ हे चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.