Sun, Feb 24, 2019 02:08होमपेज › Soneri › Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस'

Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस'

Published On: Feb 14 2018 9:08AM | Last Updated: Feb 14 2018 9:08AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

आपल्या नयनांच्या अदाकारीने नेटकऱ्यांची मनं जिंकून नेटकऱ्यांना घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाश वरियार या अठरा वर्षीय अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ आता ट्रेंडिगमध्ये आलाय. सोशल मीडियात तिच्या गाण्याची छोटीशी क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असताना तिच्या आगामी  ‘उरू अदार लव’ या चित्रपटाटा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

यात प्रिया पुन्हा एकदा रोशन अब्दुल रहूफ या अभिनेत्यासोबत दिसत आहे. व्हॅलेंटाइन आठवडा गाजवणारी ही जोडी अधिकृत टिझरमध्ये क्लासमध्ये फ्लर्टिंग करताना दिसत आहे.  चित्रपटातील गाण्याला मिळालेला तुफान लोकप्रियतेनंतर व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर चित्रपटाचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. गाण्यातील छोट्याशा क्लिप प्रमाणेच टिझरलाही नेटकरी जोरदार प्रतिसाद देताना दिसत आहेत.  

 या व्हिडिओमध्ये प्रिया प्रकाश आणि रोशन अब्दुल रहूफ एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसत आहेत. क्लासमध्ये प्रिया प्रकाश रोशनकडे पाहून हॅडगन किस देताना दिसते. काहीतासांत या व्हिडिओला दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी पसंती दाखवली आहे.