Sat, Jul 04, 2020 10:28होमपेज › Soneri › परशासोबत दिसणारी फोटोतील 'ही' मुलगी कोण? 

परशासोबत दिसणारी फोटोतील 'ही' मुलगी कोण? 

Last Updated: Jun 30 2020 3:25PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'सैराट' फेम परशा अर्थातच आकाश ठोसर सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचला. आकाशचे लाखो चाहते आहेत. त्याला मोठ्या पडद्यावर पाहणं, ही एक प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. 'सैराट', 'लस्ट स्टोरीज', 'एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड' यांसारख्या चित्रपटांतून तो दिसला. आता आकाश पुन्हा चर्चेत आला आहे. आकाशचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो केवळ आकाशचे नसून त्याच्यासोबत एका मुलीचादेखील फोटो दिसत आहे. त्यामुळे फोटोत आकाशसोबत दिसणारी ही मुलगी कोण, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.  

खरंतरं, आकाशचे जे फोटो व्हायरल झाले आहेत, ती एका ॲपची कमाल आहे. फेस ॲपच्या माध्यमातून हे फोटो एडिट केले असून आकाश जर मुलगी बनला तर तो कसा दिसेल, हे यातून दिसते. आकाशचे अनेक फोटो फेस ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. आकाशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज शेअर केले आहेत.