होमपेज › Soneri › 'तो' फिल्म पुरस्कार बोगस; माहिराची कबुली, पण...

'तो' फिल्म पुरस्कार बोगस; माहिराची कबुली, पण...

Last Updated: Feb 26 2020 4:35PM

माहिरा शर्मापुरस्कार नकली आहे, ही गोष्ट माहिती नसल्याचा माहिराने केला दावा  

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉस १३ ची कंटेस्टेंट माहिरा शर्माने इन्स्टाग्रामवर एक मोठा खुलासा केला आहे. तिला मिळालेला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ॲवॉर्ड बोगस होता. आणि या गोष्टीची तिला माहिती नव्हती, असे तिने म्हटले आहे. थर्ड पार्टीने तिला हा ॲवॉर्ड दिला होता. आता त्याने माहिराची माफी मागितली आहे. मला माफी मागण्यास का सांगितलं जात आहे? हे मला माहिती नाही, असे तिने म्हटले आहे. ती हा बोगस पुरस्कार ती परत करेल, असे तिने म्हटले आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, माहिरा शर्मावर दादासाहेब फाळके ॲवॉर्डचे बोगस सर्टिफिकेट (स्वत:चे) ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्ट‍िव्हल ॲवॉर्डचे आपले स्वत:चे नाव असलेले एक सर्टिफिकेटचा फोटो माहिराने सोशल मीडियावर शेअर केला होते. माहिराने त्या सर्टिफिकेटच्या फोटोखाली लिहिलं होतं-तिला 'मोस्ट फॅशनेबल कंटेस्टेंट ऑफ 'बिग बॉस-१३' साठी हा ॲवॉर्ड मिळाला आहे. माहिराने शेअर केलेल्या या ॲवॉर्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्ट‍िव्हलने ट्विट केले. आणि माहिरावर नकली सर्टिफिकेटचा फोटो शेअर केल्याचा आरोप करण्यात आलाय यासाठी तिने माफी मागावी, असे त्या टि्वटमध्ये म्हटले होते. आता यावर माहिरा शर्माने प्रतिक्रिया दिली असून माहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून म्हचले आहे की, दादासाहेब फाळके टीमचे मेहता यांच्याकडून तिला एक मेल आला होता.

माहिराने तिच्यावरील आरोप फेटाळले आहेत. टीमकडून तिचा मॅनेजर अभिनव तनवरला सांगण्यात आले होते की, माहिराला या पुरस्कार सोहळ्यात 'बिग बॉस १३' चा 'मोस्ट फॅशनेबल सेलेब्रिटी' पुरस्कार दिला जाईल. या सोहळ्यात आल्यानंतर जेव्हा तिने या पुरस्काराबद्दल त्या लोकांना विचारलं, तेव्हा त्यांनी हे सांगून सर्टिफिकेट दिलं की, स्टेजवर खूप साऱ्या लोकांची गर्दी असल्याने तिला स्टेजवर बोलावण्यात आले नाही. 

माहिराने स्वत:ला निरपराध असल्याचे म्हटले आहे.