Mon, Nov 20, 2017 17:25होमपेज › Soneri › ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे नाव माहित आहे का?

जाणून घ्या ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे नाव 

Published On: Nov 14 2017 1:29PM | Last Updated: Nov 14 2017 1:29PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठीतील सुपरहीट ‘सैराट’ सिनेमाची हवा बॉलिवूडमध्ये पोहोचल्याचे तुम्हाला माहितच असेल. कन्नडनंतर आता ‘सैराट’चा हिंदीमध्येही रिमेक होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. तर याची निर्मिती करण जोहर करणार आहे. या सिनेमात नव्या कलाकारांची दमदार एंट्री होणार आहे. नवे कलाकार, नवे दिग्दर्शक मग असे असताना नावही नवेच हवे. याच सिनेमाच्या नावाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. 

‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे नाव ‘धडक’ असे ठेवण्यात आले आहे. ‘सैराट’चा रिमेक करणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण जोहरने केली होती. या सिनेमात आर्ची-परशाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर आणि इशान खेतर हे दोघे बॉलिवूड डेब्यू करणार आहेत. या सिनेमाचे शुटींग डिसेंबर २०१७ मध्ये सुरू होणार आहे. 

‘सैराट’चा कन्नड रिमेक चित्रपटाचे नाव ‘मनसु मल्लिगे’ असे होते. या चित्रपटात मराठीतील अभिनेत्री रिंकू राजगूरुने मुख्य भूमिका केली होती.