हैदराबाद : पुढारी ऑनलाईन
आपल्या नयनांच्या अदाकारीने नेटकऱ्यांना घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या अभिनेत्रींने गाण्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी तिच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमधील काही मुस्लीम तरुणांनी प्रिया आणि चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली.
हैदराबादमधील काही तरुणांनी प्रियाच्या व्हायरल झालेल्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. मल्याळम अभिनेत्रीच्या गाण्याचे आम्हीही चाहते झालो आहोत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेले गाण्यातून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या गाण्यात मोहम्मज पैंगबर आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख करण्यात आला आहे. रोमॅन्टिक गाण्यात पैगंबरांचा उल्लेख करणे अपमानास्पद आहे, असे तक्रारदार खान यानी म्हटले आहे.
पण, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 'ओरू अडर लव्ह' हा मल्ल्याळम चित्रपट ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
वाचा : Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस'
वाचा : म्हणून 'प्रिया'ला धाडले होस्टेलवर