Mon, Jun 17, 2019 10:43होमपेज › Soneri › रणवीर सिंहची नवीन चिअर लीडर पाहिली का?(Video)

रणवीर सिंहची नवीन चिअर लीडर पाहिली का?(Video)

Published On: Jan 12 2019 4:45PM | Last Updated: Jan 12 2019 4:45PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचा अतरंगी अभिनेता अशी ओळख असलेला रणवीर सिंहच्‍या 'गली बॉय' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचा लाँच झाला आहे. प्रेक्षकांची देखील या ट्रेलरला चांगला प्रतिसाद असताना रणवीर सिंहला त्‍यांच्‍या 'सिंबा' या चित्रपटाला मिळालेल्‍या यशासाठी त्‍याची पत्‍नी अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून प्रोत्‍साहन दिले आहे. 

अभिनेत्री दीपिका पदुकोण इंटरनेटवर नेहमी सक्रिय असते. यावेळी तिचा एक व्‍हिडिओ पती रणवीर सिंहने  इन्स्टा अकाउंटवर चिअर व्‍हिडिओ शेअर केला आहे. त्‍यामुळे दीपिका पुन्‍हा चर्चेत आली आहे. यामध्‍ये दीपिका पांढर्‍या रंगाच्‍या शर्टमध्‍ये दिसत आहे. तिच्‍या हातात वाईनचा ग्‍लास दिसत आहे. बॉक्‍स ऑफीसर 'सिंबा'  या चित्रपटाला मिळालेल्‍या भरघोस यशाबद्दल पती रणवीरला प्रोत्‍साहन देत आहेत. यावेळी दीपिका 'सिंबा' चित्रपटातील चर्चित लाईन 'ऐ आया पोलिस' असं देखील म्‍हणताना दिसत आहे. 

View this post on Instagram

My Cheerleader 😍❤️😘🥂 @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

'सिंबा' या चित्रपटाने २०० काटीची कमाई केली आहे. या यशानंतर दीपिकाने पती रणवीरला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी हा व्‍हिडिओ केल्‍याचे दिसते. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत सहारा अली खान हिने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले आहे. 

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह २०१८ मध्‍ये लग्‍नाच्‍या बंधनात अडकले आहेत. बॉलिवूडच्‍या या लव्‍हली कपलचे लग्‍न २०१८ मध्‍ये झालेल्‍या ग्रॅण्‍ड लग्‍नांपैकी एक होते. दीपिका आणि रणवीरचा लुक या लग्‍नसोहळ्‍यात पाहण्‍यासारखा होता.