Tue, May 26, 2020 18:03होमपेज › Soneri › मी 'या' रंगाचा ड्रेस घालू का? दीपिकाची चाहत्यांना विचारणा

मी 'या' रंगाचा ड्रेस घालू का? दीपिकाची चाहत्यांना विचारणा

Published On: May 15 2019 3:37PM | Last Updated: May 15 2019 3:19PM
मुंबई: पुढारी ऑनलाई

नुकताच आतंरराष्ट्रीय मेटा गाला कार्यक्रम पार पडला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या कार्यक्रमात भारतीय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमानंतर भारतीय कलाकारांची अदा आता कालपासून सुरू झालेल्या कान फेस्टीवलमध्ये दिसणार आहे. दीपिकाही कान फेस्टीव्हल सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे.  या पार्श्वभूमीवर दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना पोलच्या रूपात एक सवाल केला आहे.

दीपिकाने ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. रेड कार्पेटवरील दीपिकाचा ‘बार्बी लूक’ चांगलाच हिट झाला. पण आता ती आपला जलवा कान फेस्टीव्हलमध्येही दाखवण्यास इच्छुक आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी पोल ठेवला आहे. कान फेस्टीवलमधील रेड कार्पेटवर चालण्यासाठी लाल रंगाचा पोशाख परिधान करू का? असा प्रश्न पोलच्या रूपात चाहत्यांना सवाल केला आहे. 

s

या पोस्टपूर्वी काल तिने कान फेस्टीव्हसाठी जय्यत तयारी करत असलेले फोटो शेअर केले होते. दीपिकाने इंस्टाग्रामवर वर्कआऊटचे फोटो शेअर केले आहेत. दीपिकादेखील ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर यांच्यासह कान्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहचली आहे. दीपिका यंदा तिसऱ्यांदा कान्स महोत्सवात रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसणार आहे. 

dinsta

dinsta

दीपिका सध्या तिच्या ‘छपाक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.