Sun, Nov 18, 2018 18:15होमपेज › Soneri › श्रीदेवीच्या 'चांदणी' चित्रपटाला २९वर्षे पूर्ण! See Video

प्यार हवा का एक झोंका है…जो सब उड़ाकर ले जाता है

Published On: Sep 14 2018 4:54PM | Last Updated: Sep 14 2018 5:11PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

चांदणी म्हणताच नजरेसमोर येते ती श्रीदेवी आणि ऋुषी कपूर यांची प्रेमकहाणी. आज याच पडद्यावरच्या प्रेमकहाणीला २९वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाची केवळ प्रेमकहाणीच नव्हे तर यामधील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ पडली. ती गाणी आजही लोकांच्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाहीत. 

चांदणी हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. पडद्यावरील रोमान्सचा बादशहा समजल्या जाणाऱ्या यश चोप्रा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, श्रीदेवी व विनोद खन्ना ह्यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘चांदणी’ चित्रपटाचे संपूर्ण शुटिंग स्वित्झर्लंड मध्ये करण्यात आले होते.

 कुणीतरी नाकारल्यानं ती दुःखी तर आहे पण त्याचवेळी दूसऱ्याबरोबर जीवन पुन्हा सुरू करण्याविषयी ती अडखळत नाही. भलेही तो प्रयत्न अयशस्वी ठरतो. अशी प्रेमकहणी असणारा हा चित्रपट अजुनही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे.

चांदणी ओ मेरी चांदणी

मेरे हाथो में नवौ नवौ चुडिया