Mon, Jun 17, 2019 10:33होमपेज › Soneri › कॅटरिनाचा पुन्‍हा तेलुगु चित्रपटांकडे मोर्चा  

कॅटरिनाचा पुन्‍हा तेलुगु चित्रपटांकडे मोर्चा  

Published On: Jan 12 2019 4:57PM | Last Updated: Jan 12 2019 5:01PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

साऊथ स्‍टार (आणि आपल्या नम्रता शिरोडकरचा नवरा!) महेश बाबूचा ‘भारत अने नेनू’ हा चित्रपट यशस्‍वी ठरला. या चित्रपटाने घसघशीत कमाईही केली होती. आता महेश बाबू पुन्‍हा मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहेत. विशेष म्‍हणजे, बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने पुन्‍हा आपला मोर्चा दक्षिणेकडील चित्रपटांकडे वळवला आहे. 

दिग्‍दर्शक सुकुमार आपल्‍या आगामी चित्रपटामध्‍ये महेश बाबूसोबत कॅटला कास्‍ट करणार असल्‍याचे वृत्त आहे. कॅटने याआधी दोन तेलुगु चित्रपट केले आहेत. जर कॅटला हा नवा चित्रपट मिळाला तर तिचा हा तिसरा तेलुगु चित्रपट असणार आहे. 

Related image

वाचा : 'हा' सुपरस्‍टार देणार 'बाहुबली'ला टक्‍कर! 

या चित्रपटाचे टायटल अद्‍याप ठरले नाही. दिग्‍दर्शक सुकुमार या चित्रपटात महेश आणि कॅटरिनाला एकत्र साईन करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत. आतापर्यंत याविषयी कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सुकुमार यांच्‍या चित्रपटासाठी महेश बाबूने होकार कळवला आहे. आता फक्‍त कॅटच्‍या होकाराची प्रतीक्षा आहे. 

Related image

कॅटने हा चित्रपट करण्‍यासाठी होकार कळवला तर तब्‍बल १० वर्षांनी तिचा हा तिसरा तेलुगु चित्रपट असणार आहे.  कॅटने व्‍यंकटेश दुग्गुबतीचा चित्रपट 'मल्लिश्वरी'मधून (२००४) तेलुगू चित्रपटात डेब्यू केले होते. त्‍यानंतर, त्‍यांनी नंदमूरी बालकृष्ण यांच्‍यासोबत 'अलारी पिडुगु'मध्‍ये काम केले होते. 

सध्‍या कॅट 'भारत' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्‍य भूमिकेत आहे.