Sun, Dec 08, 2019 06:15होमपेज › Soneri › बिग बॉस: 'वीणा'चे फॉलोअर्स सर्वात अधिक

बिग बॉस: 'वीणा'चे फॉलोअर्स सर्वात अधिक

Published On: Jun 17 2019 12:44PM | Last Updated: Jun 17 2019 12:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विणा जगताप आता बिग बॉस मराठी सीजन २ मधून आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घरातील सदस्यांबरोबरचा तिचा वावर असो वा टास्क दरम्यान तिने केलेली मस्ती असो, तिचे चाहते तिला सतत प्रोत्साहित करताना दिसून येत आहेत. 

बिग बॉस मराठी सीजन २ मधील तिचा मनमोकळा आणि स्पष्टवक्तेपणा लोकांना आवडत आहे. बिग बॉस मराठी सीजन २ मधील तिच्यासोबत घरात असलेल्या स्पर्धकांच्या तुलनेत 'वीणा' चे सोशल नेटवर्किंगवरील फॉलोअर्स कमालीचे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. 

तर इन्स्टाग्रामवरील तिच्या खाजगी अकाउंटवर १५१k फॉलोअर्स  दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे या आकडयांच्या आसपास 'बिग बॉस मराठी सीजन २'चा एकही सदस्य आतापर्यंत पोहोचू शकलेला नाही.