Thu, Nov 14, 2019 06:58होमपेज › Soneri › बादशाहाच्या 'या' गाण्याचा विश्वविक्रम (video)

बादशाहाच्या 'या' गाण्याचा विश्वविक्रम (video)

Published On: Jul 12 2019 7:10PM | Last Updated: Jul 12 2019 6:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहाच्या गाण्यांनी बॉक्स ऑफिसवर कायमच धुमाकूळ घातला आहे. आता आणखीण नव्याने एकदा बादशाहाने 'पागल' हे गाणे घेवून आला आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला नाही तर विश्वविक्रम केला आहे. 'पागल' या गाण्यांला २४ तासांत ८ कोटींहून अधिक लोंकानी पाहिले आहे. तर या गाण्याची लोकप्रियता खूपच वाढत चालली आहे. 

बादशाहाने 'पागल' या गाण्याने विश्वविक्रम केल्याची घोषणा सोशल मिडियावरून केली. तर या पोस्टसोबत बादशाहाने लिहिले आहे की, 'आम्ही हे करून दाखवले. जगभरात २४ तासांमध्ये 'पागल' या गाण्यांचा व्हिडिओ सर्वाधिक पाहिला गेला आहे. जय हिंद, मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.' या पोस्टमुळे बादशाहाने विश्वविक्रम आणि भारतीय असल्याचा गर्व व्यक्त केला आहे.  

'पागल' या गाण्याचा व्हिडिओ युटयूब चॅनलवर रिलीज झाला आहे. या गाण्याच्या लिरिक्सला काही चाहते विरोध करत आहेत. तर काही चाहत्यांना हे गाणे खूपच आवडले आहे. या गाण्यांला लिरिक्स आणि म्यूझिक स्वत: बादशाहाने दिले आहे.    

(video : badboyshah instagram, Sony Music India youtube वरून साभार)