Sat, Jul 04, 2020 11:48होमपेज › Soneri › आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ७ जणांना लागण 

आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ७ जणांना लागण 

Last Updated: Jun 30 2020 1:22PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

कोरोना विषाणूने आता आमीर खानच्या घरी शिरकाव केला आहे. आमीरच्या घरातील ७ स्टाफ मेंबर्सचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
यात आमीर खानचा एक चालक, दोन सुरक्षा रक्षक आणि एक स्वयंपाकीचा समावेश आहे. 

आमीर खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून याबद्दलची माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे, "मी लोकांना सूचित करू इच्छितो की, माझ्या स्टाफचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याबद्दलची माहिती मिळताच त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी पाऊल उचलत त्यांना मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या. मी बीएमसीचे आभार मानतो की, त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे आणि त्यांनी तत्काळ संपूर्ण सोसायटी सॅनिटायझेशन केलं आहे. आमच्यातील काही लोकांची टेस्ट करण्यात आली आहे आणि सर्वांची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. सध्या मी माझ्या आईच्या टेस्टसाठी जात आहे...प्रार्थना करा माझ्या आईची टेस्ट नेगेटिव्ह यावी.'' 

आमीर खान १५ जुलैपासून 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी उत्सुक होता. परंतु, आता स्टाफमधील ७ मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी उशीर होऊ शकतो.