मुंबई : पुढारी ऑनलाईन
या ११ अभिनेत्रींची प्रेमकहाणी त्यांच्या चित्रपटापेक्षाही जास्त रंजक आहे. पडद्यावर प्रेमाचे रंग भरता भरता कसे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यात प्रेम फुलले. याच प्रेमाचे रुपांतर नंतर लग्नात झाले. यामध्ये काही अभिनेत्रींनी चित्रपट निर्मात्यांशीही तर काहींनी चित्रपट दिग्दर्शकासोबत संसार थाटला. यापैकी काही दिग्दर्शकांचे आधी लग्न झाले असतानाही केवळ प्रेमापोटी त्यांनी अभिनेत्रीसोबत लग्न करुन दुसरा संसार थाटला. रुपेरी पडद्यावरील म्हणजे चित्रपटातील प्रेमकाहणी पेक्षाही यांच्या वैयक्तीक आयुष्यातील प्रेमप्रकरणांनी त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींची प्रेमकाहणी ज्यांनी दिग्दर्शक व निर्मात्यांशी लग्न केले.
१. श्रीदेवी आणि बोनी कपूर
श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘सोलहवां सावन’ पाहून चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्यावर प्रेम झाले होते. १९८४ मध्ये बोनी कपूर यांनी मोना कपूर यांच्याशी लग्न केले होते. मोना कपूर यांच्यापासून त्यांना अर्जुन आणि अंशुला अशी दोन मुले झाली. बोनी कपूर यांनी १९८७ मध्ये त्यांची 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात फीमेल लीड, म्हणजे मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यावेळी श्रीदेवी यांच्या आईने त्यांच्याकडे दहा लाख फी मागितली. बोनी कपूर यांनी ११ लाख दिले तसेच सेटवरती विविध सुविधा पुरविल्या. श्रीदेवी जेव्हा यशराजच्या चांदनी चित्रपटासाठी परदेशी गेली असता बोनी कपूर तिला भेटण्यांसाठी तिथे केले. त्यावेळी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला नव्हता, कारण बोनी कपूर यांचे लग्न झालेले होते. मात्र श्रीदेवी यांची आई आजारी असताना त्यांच्या उपचारासाठी त्या अमेरिकेला गेल्या असता, त्याचवेळी बोनी कपूर यांनी त्यांना आधार दिला. तेव्हाच त्यांनी बोनी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९६ मध्ये दोघांनी लग्न केले. नंतर त्यांनी जान्हवी आणि खूशी या दोन मुलींना जन्म दिला.
२. बिंदिया गोस्वामी आणि जे.पी. दत्ता
बिंदीया गोस्वामी यांनी १८ वर्षाच्या असताना बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर नाव कमावले होते. त्यावेळेस त्यांच्या चित्रपटातील सहअभिनेता विनोद मेहरा यांच्याशी प्रेमसंबंध होते. १९८० मध्ये त्यांनी लग्न केले. विनोदचे यापूर्वी लग्न झाले होते. विनोद यांच्याशी त्यांचे लग्न चार वर्षेच टिकू शकले. त्यानंतर दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांच्याशी त्यांची पहिली भेट १९७६ मध्ये चित्रपट ‘सरहद’ च्या सेटवर झाली. १९८५ मध्ये ‘ग़ुलामी’ या चित्रपटाच्यावेळी त्यांच्यात प्रेम फुलले व त्याचवर्षी त्यांनी लग्न केले. त्यानंतर दोघांना निधी व सिद्धी या मुली झाल्या.
३. कल्की कोचलिन आणि अनुराग कश्यप
अनुराग कश्प यांचे पहिले लग्न चित्रपट एडिटर आरती बजाज यांच्याशी झाले होते. २००१ मध्ये त्यांना आलिया नावाची मुलगी झाली त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी दाघे वेगळे झाले. अनुराग यांचे चित्रपटात क्षेत्रात करिअर खास चालत नव्हते. त्यामुळे त्यांना व्यसनाने व निराशेने ग्रासले होते. त्याचवेळी त्यांची भेट बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन हिच्याशी झाली. २००८ मध्ये ‘देव डी’ या चित्रपटासाठी अनुराग कश्प यांनी कल्कीची निवड केली. चित्रपटाच्या शुटिंगला ६ महिने झाल्यानंतर ते कल्की व अनुराग एकत्र दिसू लागले. यानंतर अनुरागने कल्कीला प्रपोज केले आणि दोघे लिव्ह-इनमध्ये राहू लागले. २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. पण, हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
४. राम्या कृष्णन आणि कृष्णा वाम्सी
‘बाहुबलीः द कनक्लूजन’ आणि ‘बाहुबलीः द बिगिनिंग’ या चित्रपटात शिवगामी ही भूमिाका साकारणाऱ्या अभिनेत्री 'राम्या कृष्णन' यांना चित्रपट दिग्दर्शकावर प्रेम झाले होते. १९९८ मध्ये ‘चंद्रलेखा’ या तेलगू चित्रपटच्या शुटिंग दरम्यान दिग्दर्शक 'कृष्णा वाम्सी' यांच्यहशी त्यांची भेट झाली. तेव्हाच त्या दोघांत प्रेम झाले. ११ जून २००३ मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये त्यांनी लग्न केले. हिंदी चित्रपटात अभिनेत्री राम्या यांनी अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत ‘चाहत’ (१९९६), अभिनेता गोविंदा यांच्या सोबत ‘बनारसी बाबू’ (१९९७) या चित्रपटात काम केले आहे.
५. दीप्ती नवल आणि प्रकाश झा
जेव्हा 'प्रकाश झा' १९८४ मध्ये त्यांच्या 'हिप हिप हुर्रे' या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, त्यावेळी चित्रपटाची अभिनेत्री दीप्ती नवल यांच्यावर त्यांना प्रेम झाले. चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी त्यांनी तिच्याशी लग्न केले. त्यानंतर पकाश झा यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या ‘दामुल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर काही दिवसांनी दोघे वेगळे झाले.
६. किरण जुनेजा आणि रमेश सिप्पी
'शोले' या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे पहिले लग्न गीता यांच्याशी झाले. गीता यांच्यापासून रोहन नावाचा मुलगा आहे. रमेश सिप्पी दूरदर्शनसाठी 'बुनियाद' या मालिकेचे दिग्दर्शन करत असताना, त्यामध्ये काम करत असणाऱ्या अभिनेत्री किरण जुनेजा यांच्यावर प्रेम झाले. पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर १९९० मध्ये दोघांनी लग्न केले. तेव्हा किरण ३० वर्षाच्या होत्या व रमेश ४२ वर्षाचे होते.
७. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने यशराज बॅनरच्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. या यशराज बॅनरचे प्रमुख आदित्य चोप्रा आहेत. त्यांनी आतापर्यंत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यासारखे महत्त्वाच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आादित्य चोप्रा यांनी ४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पण, त्यापैकी एकाही चित्रपटात राणीने काम केले आहे. मात्र यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या बऱ्याच चित्रपटात राणीने मुख्य भूमिका साकारली आहे. याचमुळे दोघे एकमेंकांना ओळखत होते. आदित्य यांचे तेव्हा लग्न झाले होते. मात्र त्यांच्या काही मित्रांच्या मते, त्या दोघांच्यात रिलेशन होते पण सर्वांच्या समोर दोघांनीही कधीच मान्य केले नाही. पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर दोघांनी इटलीमध्ये २१ एप्रिल २०१४ मध्ये लग्न केले. दोघांना आदिरा नावाची मुलगी आहे.
८. उदिता गोस्वामी आणि मोहित सूरी
उदिता गोस्वामीने चित्रपट करिअरची सुरुवात भट्ट कॅम्पमच्या २००३ मध्ये आलेल्या ‘पाप’ या चित्रपटातून केली. २००५ मध्ये आलेला तिच्या ‘ज़हर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सूरी होते. पहिल्या चित्रपटाच्यावेळी त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्याचे रुंपातर प्रेमात झाले. २९ जानेवारी २०१३ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षानीं त्यांना मुलगी झाली.
९. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली आणि गोल्डी बहल यांची पहिली भेट १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या 'नाराज' या चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांच्यात प्रेम झाले. सर्वासमोर दोघांनी त्यांच्यातील नाते कधीच मान्य केले नाही. निर्माता गोल्डी बहल यांच्या पहिल्या 'अंगारे' या चित्रपटात सोनालीने काम केले. १२ नोंव्हेबर २००२ मध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. आता दोघांना दोन मुले आहेत.
१०. सोनी राजदान आणि महेश भट्ट
महेश भट्ट जेव्हा २२ वर्षाचे होते तेव्हा प्रमिका लॉरेन ब्राइट उर्फ किरण हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर पूजा भट्ट हिचा जन्म झाला. त्यानंतर काहीदिवस महेश यांचे नाव 'परवीन बॉबी' यांच्याशी जोडले गेल्याची चर्चा असतानाच १९८२ मध्ये किरण यांनी राहूल भट्ट याला जन्म दिला. १९८१ मध्ये ’३६ चौरंगी लेन’ या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री सोनी राजदान यांच्यावर प्रेम झाले. महेश भट्ट यांनी १९८४ दिग्दर्शन केलेल्या ‘सारांश’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. ९८६ महेश भट्ट यांनी धर्म परिर्वतन केल्यानंतर सोनी यांच्याशी लग्न केले. किरण यांना या लग्नाची माहिती काही दिवसांनी मीडियातून समजली. तेव्हा महेश यांच्या 'नाम' या चित्रपटाचे काम सुरु होते. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनी राजदान यांनी आलिया आणि शाहीन यांना जन्म दिला.
११. शेफाली शेट्टी आणि विपुल शाह
शेफाली शेट्टी यांनी १९९५ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटात त्यांचे थोडकेच सीन होते. तरीही त्यांनी टीव्हीवर काम मिळाले. तेथेच त्यांची भेट हर्ष छाया यांच्याशी झाली. १९९७ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना शेफाली छाया हे नाव मिळाले, दोघांचेही टीव्ही जगातात चांगले नाव होते. याचदरम्यान १९९९ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ या चित्रतटातून शेफाली यांना नवीन ओळख मिळाली. त्यांनी या चित्रपटात भीखू मात्रे यांच्या पत्नीची भूमिका साकारली. काही दिवसांनी त्यांचे व हर्ष छाया यांच्यातील संबंध बिघडले. त्याचवेळी ‘दारिया छोड़ू’ या गुजराती चित्रपटात काम करत असताना त्यांच्या आणि विपुल शाह यांच्यात प्रेम झाले. विपुल शाह यांन शेफाली पहिल्यापासूनच आवडत होती. १९९२ ते १९९३ दरम्यानची घटना आहे, तेव्हा शेफाली एका गुजराती मालिकेत काम करत होत्या. त्यावेळी विपुल यांनी शेफाली यांनी विविध भूमिकांची ऑफर दिली पण त्यांनी प्रत्येकवेळेस त्याला नकार दिला. शेवटी त्या ‘दारिया’ यामध्ये काम करण्यास तयार झाल्या आणि तेव्हाच दोघांच्यात सेटवर प्रेम झाले. २००१ मध्ये हर्ष आणि शेफाली वेगळे झाले. त्यानंतर विपुल शहा आणि शेफाली यांनी नवीन संसार थाटला. २००५ मध्ये विपुल शाह यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘वक्त’ या चित्रपटात त्यांनी अमिताफ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली.