Mon, Jun 17, 2019 11:05होमपेज › Soneri › #MeeToo'सैराट' फेम गायिका चिन्मयीचा 'या' गीतकारावर आरोप

#MeeToo'सैराट' फेम गायिका चिन्मयीचा 'या' गीतकारावर आरोप

Published On: Oct 12 2018 10:56AM | Last Updated: Oct 12 2018 10:56AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सोशल मीडियावर दिवसेंदिवस #MeToo मोहिमेच्‍या माध्‍यमातून अनेक दुर्देवी किस्‍से, घटना समोर येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्‍यान, हे सुरू असतानाच आता 'सैराट' फेम गायिका चिन्मयी श्रीपादाने देखील एक खळबळजनक खुलासा केला आहे.

'सैराट' चित्रपटाच्‍या शीर्षक गीतामुळे चिन्मयी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने तमिळ गीतकार-कवी वैरामुथू यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून ती घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली आहे.
चिन्मयीने २००५-०६च्या दरम्यानची एक कटू आठवण सांगितली आहे. तिने ट्‍विटरवर लिहिले आहे, तिच्या कॉन्सर्ट आयोजकांनी तिला वैरामाथू यांना भेटण्यास सांगितले होते. मात्र, मी त्याला नाकार दिला होता. तेव्हा तिला तिचे करियर खराब होईल, असा इशारा देण्यात आला होता.

वैरामाथू यांच्या वागणुकीची त्यांच्या सहकार्‍यांना माहिती होती, असंही चिन्मयीने म्‍हटले आहे. याबाबतच्या अनेक पोस्ट तिने ट्‍विटरवर शेअर केल्या आहेत.