Sun, Feb 24, 2019 02:46होमपेज › Soneri › #MeToo ; 'त्‍याला' शिक्षा मिळाली पाहिजे : फराह खान

#MeToo ; 'त्‍याला' शिक्षा मिळाली पाहिजे : फराह खान

Published On: Oct 12 2018 6:30PM | Last Updated: Oct 12 2018 6:23PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

#MeToo या मोहिमेने बॉलिवूडमध्‍ये जोर धरला आहे. दररोज नवीन खुलासे होत आहेत. नाना तनुश्री वादामुळे दबलेल्‍या आवाजाना व्‍यक्‍त होता येत आहे. हाऊसफुल'चे दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर अक्षयने 'हाऊसफुल ४'चे शुटिंग थांबवले आहे. साजिद खाननेही या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या पदावरुन काढता पाय घेतला आहे. यावर आता साजिद खानची बहीण आणि सुप्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खाननेही  ट्‍वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

फराह खानने म्हटले आहे,  सध्या आमचे कुटुंब कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. ही आमच्यासाठी खूप कठीण वेळ आहे. जर माझ्या भावाने अशाप्रकारचे कृत्य केले असेल, तर त्‍याची शिक्षा त्‍याला मिळाली पाहिजे.  मी अशाबाबतीत त्याचे समर्थन करणार नाही. त्याच्यामुळे ज्या महिलांना त्रास झाला आहे, मी त्यांना पाठिंबा देईल. या मोहिमेस माझा पठिंबा आहे.

 #MeeToo मोहीमेतून अनेक दिग्गज कलाकारांची नावे  समोर आली आहेत. सोशल मीडियाचा आधार घेत पीडित महिला कटू घटना शेअर करत आहेत. दबलेल्‍या आवाजांना या माध्‍यामातून श्‍वास मिळाला आहे.