होमपेज › Solapur › गामा पैलवानसह सात आरोपींची ओळख परेड होणार

गामा पैलवानसह सात आरोपींची ओळख परेड होणार

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 10:20PMसोलापूर : प्रतिनिधी

आबा कांबळे खुनात अटकेत असलेल्या गामा पैलवानसह सात आरोपींना जिल्हा न्यायाधीश डी.के. अनभुले यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.  सरकार पक्षाचा ओळख परेड घेण्याचा अर्ज मंजूर केला. 

मुख्य आरोपी सुरेश अभिमन्यू शिंदे उर्फ  गामा पैलवान (वय 68, रा. पाणी वेस तालीम), गणेश उर्फ अभिजित  चंद्रशेखर शिंदे (वय 25, मुरारजी पेठ, निराळे वस्ती), रविराज दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ), प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (वय 30 रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ), तौसिफ गुरूलाल विजापुरे (वय 27, रा. मेहताबनगर, शेळगी), निलेश प्रकाश महामुनी (वय 35), विनित कोणारे (रा. पुणे) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.2004 साली झालेल्या ऋतुराज शिंदेच्या खुनाचा राग मनात धरुन आबा कांबळेचा कट रचून खून करण्यात आला होता.

यात तपास अधिकारी सहायक आयुक्‍त डॉ. दीपाली काळे यांनी आरोपींचे मोबाईल हस्तगत केले आहेत. आठवा कोयताही जप्त केला. गाड्याही जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्यासाठी मंगळवार बाजारातून ज्या महिलेकडून कोयते खरेदी केले होते त्या महिलेसंदर्भात माहिती मिळाली असून तिच्याकडे तपास करण्यात आला आहे.

सर्व आरोपींची तपासाची पूर्तता झालेली असल्याने  न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.