Sat, Jul 11, 2020 12:18



होमपेज › Solapur › वैराग पोलिसांकडून विवाहितेच्या खूनाचा उलगडा

वैराग पोलिसांकडून विवाहितेच्या खूनाचा उलगडा

Published On: Dec 19 2018 7:51PM | Last Updated: Dec 19 2018 7:51PM




वैराग : प्रतिनिधी

वैरागमध्ये आठ दिवसापूर्वी झालेल्या पस्तीस वर्षीय विवाहितेच्या खूनाचा गुंता वैराग पोलिसांनी सोडवला असून, या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. वडिलांच्या अनैतिक संबधामुळे घरातील शांतता नष्ट होऊ लागल्याने चिडून दोघा सख्या चुलत भावांनी मिळून खून केला असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.  

याबाबतची अधिक माहीती अशी की, उत्रेश्वर खराटे (रा. भोगजी, ता. वाशी ) हा तीन वर्षापासून ऊसतोडीचा मुकादम म्हणून काम करीत आहे. दरम्यान त्यांच्याच नात्यातील क्रांती अश्रूबा दराडे ही ऊसतोडणी मजूर म्हणून त्याच्याकडे कामास होती. दररोज उत्रेश्वरच्या गाडीतून येणे-जाणे होत असल्याने त्यांचे सुत जुळले. त्यातून पुढे त्यांच्यात अनैतिक संबध चालू झाले. हळूहळू क्रांती उत्रेश्वरच्या घरी येऊ लागली. उत्रेश्वरच्या घरी यावरून सारखे खटके उडू लागले. त्यामुळे घरात मारहाण, शिवीगाळी वाढू लागली त्यामुळे उत्रेश्वरचा दहावीत शिकण्याऱ्या मुलावर विपरीत परीणाम होऊ लागला. याच काळात क्रांती दराडे वैराग येथील पंचशील नगर येथे गेल्या सहा महिण्यांपासून एकटीच  राहण्यास आली होती.  दि.१३ रोजी उत्रेश्वर आणि त्याचा भाऊ बालाजी या दोघांची दोन अल्पवयीन मुले वैरागमध्ये आली. आम्ही घरी भांडून आलो आहोत असे म्हणून क्रांतीच्या घरी रात्री त्यांनी मुक्काम केला.

मध्यरात्रीच्या सुमारास या दोघा भावांनी क्रांतीला झोपलेले  पाहून  तिच्यावर चाकूने तेरा वार केले, यात क्रांती जागीच ठार झाली. त्यानंतर दोघांनी चालतच पानगाव गाठले. तेथून एसटीने बार्शीला गेले. पुढे रेल्वेने येरमाळा करून बीडला पोहचले आणि चार दिवसानंतर गाव गाठले. 

दरम्यान, खूनाच्या काही वेळानंतरच वैराग पोलिसांनी तपासाची पथके मूळ गावाकडे रवाना केली होती. त्यांच्या प्राथमिक तपासात दोघे अल्पवयीन चुलत भाऊ गायब असल्याचे दिसून आले. त्यांच्या शाळेत चौकशी केल्यानंतरही यास दुजोरा मिळाला. अखेर सापळा रचून त्यांना पकडून वैरागला आणले. अल्पवयीन असल्याने त्यांची चौकशी करुन सोलापूरच्या बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.