Sat, Sep 21, 2019 06:48होमपेज › Solapur › अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा खून 

अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा खून 

Published On: Mar 07 2018 10:34PM | Last Updated: Mar 07 2018 10:34PMमोहोळ : प्रतिनिधी 

अनैतिक संबधाला आड येणार्‍या नवर्‍याचा पत्‍नीने दिराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची घटना मोहोळ पोलीसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी केवळ पाच तासात या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी दिर आणि पत्‍नीला गजाआड केले.  युवराज देविदास कापुरे (वय 31 रा. कोळेगाव ता. मोहोळ) असे खून झालेल्‍या पतीचे नाव आहे. या प्रकरणी मयताची पत्नी मोनाली युवराज कापुरे (वय- 22 रा. कोळेगाव) आणि मयताचा भाऊ आकाश देविदास कापुरे (वय-25 रा. कोळेगाव ता. मोहोळ) या दोघां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील युवराज देविदास कापुरे हा झोपेतून उठत नसल्याची बाब त्याची पत्नी मोनाली हिच्या मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता लक्षात आली. याबाबतची माहिती तिने जवळच राहणार्‍या सासु व दिराला दिली. त्यावेळी युवराज याची आई व दोन भाऊ यांनी बेशुध्दावस्थेत आहे असे समजून युवराज याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सकाळी मयत युवराजचाचा पंचनामा होताना त्याचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी ही बाब खुनाची असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांना मयत युवराजची पत्नी मोनालीला ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. यावेळी महिला पोलिस कर्मचार्‍यांनी मोनालीची कसून चौकशी करत प्रश्‍नांचा भडीमार केल्यावर पोलिसांना युवराजचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती समजली. 

पोलिसांनी मयताचा सख्या भाऊ आकाश कापुरे याला देखील ताब्यात घेतले. मयताची पत्नी कोमल हिने दिलेल्या माहितीनुसार मयत युवराज याचा सख्या भाऊ आकाश मोनाली यांच्यात अनैतिक संबध होते. ही बाब युवराजला समजल्याने त्यांचे दोन महिन्यापूर्वी मोनालीशी भांडण देखील झाले होते. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता मोनाली व दिर आकाश यांनी संगनमताने युवराज याचा दोरीने गळा अवळून खून केल्याची माहिती आरोपी कोमल हिच्याकडून पोलिसांना मिळाली.