Sun, Dec 08, 2019 06:46होमपेज › Solapur › मोहोळ सेतू कार्यालयात अज्ञात चोरट्याने  वकिलाचा खिसा कापला

मोहोळ सेतू कार्यालयात अज्ञात चोरट्याने  वकिलाचा खिसा कापला

Published On: Jun 20 2019 11:31PM | Last Updated: Jun 21 2019 1:09AM
मोहोळ : वार्ताहर

मोहोळ शहर परिसात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी १९ जून रोजी मोहोळ सेतू कार्यालयातून एका वकीलाचे ३५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले.  या प्रकरणी गुरुवारी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील अॅड. सुरेश दशरथ पवार हे १९ जून रोजी मोहोळ सेतू कार्यालयात विभक्त रेशन कार्ड बाबत चौकशी करण्यासाठी आले होते. त्यानंतर ते तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत गेले होते. त्यावेळी त्यांनी मुलीच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी मागील खिशात ठेवलेले तब्बल ३५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

अॅड. सुरेश पवार हे दाढी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सेतू कार्यालय आणि पुरवठा शाखा या ठिकाणी चौकशी केली. मात्र त्यांचे पैसे कुठेच मिळून आले नाहीत. या प्रकरणी अॅड पवार यांनी २० जून रोजी मोहोळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अत्यंत गजबजलेल्या परिसरातून दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे मोहोळ शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मोहोळ चे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.