Mon, Sep 16, 2019 11:35होमपेज › Solapur › भोयरेजवळ दुचाकी अपघातात दोन ठार

भोयरेजवळ दुचाकी अपघातात दोन ठार

Published On: May 07 2019 2:01AM | Last Updated: May 07 2019 12:07AM
बार्शी ः तालुका प्रतिनिधी 

अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे तरुण जागेवरच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास बार्शी ते भूम मार्गावरील भोयरे गावाजवळील पुलाजवळ घडली.

मृतांमध्ये  उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दोघा तरुणांचा समावेश  आहे. मृतांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.  वाशी तालुक्यातील दोघे तरुण हे दुचाकीवरून आगळगाव-भोयरेमार्गे बार्शी शहराकडे कामानिमित्त जात होते. दरम्यान, बार्शी शहराकडून भूमकडे भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघे तरुण गाडीवरून खाली पडले असता दोघांच्याही  डोक्यांवरून अज्ञात वाहन भरधाव वेगाने गेले.