Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Solapur › ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक (व्हिडिओ)

ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक (व्हिडिओ)

Published On: Nov 15 2017 12:16PM | Last Updated: Nov 15 2017 12:16PM

बुकमार्क करा

मंगळवेढा : प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. मात्र अद्याप कुणीही दर जाहिर केला नसल्याने, शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत आज (बुधवार) सकाळी सोलापूर-मंगळवेढा या महामार्गावर माचणूर येथील चौकात रास्ता रोको करण्यात आला. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बिराजदार शहराध्यक्ष राहुल घुले, दत्ता पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

मात्र, पोलिसांनी जलद हालचाली करत अर्ध्या तासात रास्ता रोको गुंडाळला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध केला. शासनकर्ते कारखानदारांच्या पाठीशी असल्यानेच कारखानदार आज धाडस करीत आहेत, शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका यावेळी आंदोलन कर्त्यांनी घेतली. या रास्ता रोकोस शेकडो शेतकरी उपस्थित होते.