Sat, Aug 24, 2019 09:59होमपेज › Solapur › सोलापूर : महापौर म्हणतात...आयुक्त मस्तवाल

सोलापूर : महापौर म्हणतात...आयुक्त मस्तवाल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी
 महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचे नाराज असलेल्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी शनिवारी रौद्र रुप धारण करत आयुक्तांवर अनेक आरोप केले. ‘आयुक्त मस्तवाल बनले असून त्यांच्याविरोधात आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार’, या शब्दांत महापौरांनी आयुक्तांवर शरसंधान करुन एकच खळबळ उडवून दिली आहे.

मनपात भाजपची सत्ता येऊन वर्ष उलटले. सत्ताधारी दोन गटांतील वादामुळे मनपाच्या अनेक सभा वादग्रस्त ठरल्या. सहकारमंत्री विरुद्ध पालकमंत्री या दोन गटांनी एकमेकांवर कुरघोडी, शह-काटशह  देण्याचा प्रयत्न केला.  या अंतर्गत राजकरणामुळे स्थायी समिती सभापतीची निवडणूक देखील वादग्रस्त ठरली. यानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या तंबीमुळे दोन गट एकत्र येऊन काम करीत असल्याने सारेकाही आलबेल असल्याचे चित्र दिसत असताना महापौर व आयुक्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे.  जीआयएस मक्ता रद्द करणे तसेच अन्य विषयांबाबत महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले. आयुक्तांनी जीआयएसचा मक्ता रद्द न करण्याची भूमिका घेतल्यामुळे महापौर जाम खवळल्या. यावरुन ‘इंटरेस्ट’ असल्याचे आरोपही झाले. 

महापौर-आयुक्तांमध्ये बिनसल्याचे सर्वश्रुत झाले असताना शनिवारी त्यांच्यातील वादाने वेगळेच वळण घेतले. मनपाची सभा कोरमअभावी तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौरांनी आयुक्तांबाबत आपला रोष प्रकट केला. मी दिलेल्या पत्रांना आयुक्तांनी पत्राद्वारे उत्तर देणे अपेक्षित आहे, मात्र आयुक्त तसे करीत नाहीत. कामानिमि त्त भेटायला गेलेल्या नगरसेवकांना आयुक्त टाळत आहेत. भेटीची वेळ घेऊनच भेटण्यास ते सांगत असून असा प्रकार मी अजिबात खपवून घेणार नाहीत. एकंदर आयुक्त मस्तवाल , हेकेखोर बनले असून त्यांच्याविरोधात मुख्यमं त्र्यांकडे तक्रार करणार, असे महापौर म्हणाल्या.


  •