होमपेज › Solapur › सोलापूर : वाळू उपशावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 

सोलापूर : वाळू उपशावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 

Published On: Feb 10 2018 5:16PM | Last Updated: Feb 10 2018 5:17PMवैराग : प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या पात्रात अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलिस विशेष पथकाच्या  दोन ठिकाणच्या कार्यवाहीत दोन जेसीपी , सहा ट्रॅकटर , चार मोटार सायकलीसह सुमारे सदुसष्ठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून याप्रकरणी एकूण तेरा जणावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची घटना शुक्रवार दि .९ फेब्रुवारी रोजी घडली . विषेश म्हणजे अवैध वाळू उपशावर बार्शी तालुक्यातील आता पर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही केल्याने वाळू माफियांचे थांबे दणाणले आहेत.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहिती नुसार इर्ले ,ता .बार्शी व यावली तालुका बार्शी या गावाच्या हद्दीत भोगावती नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात इर्ले व यावली येथे पिवळ्या रंगाचे दोन जेसीपी किंमत ३८००००० रु, तसेच सहा ट्रॅक्टर हेड-आठ ट्रॅक्टर ट्रॉली किंमत २७,८९००० रु, चार मोटारसायकल किंमत ११००००/रु तसेच दहा हजार रुपयांचे किर्लोस्कर कंपनीचे इंजिन असा वाळू सह एकूण ६७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बाळासाहेब भागवत शिंदे, कुंडलिक बलटू मेरड, महेश महादेव घायतिडक (रा .काळेगांव) धनाजी त्रिनबक पाखरे रा. मानेगांव (धा), अभिजित भारत शिंदे (रा. इर्ले) अंकुश राजेंद्र शिंदे (रा. इर्ले), भारत भागवत शिंदे (रा .इर्ले), अजित भारत शिंदे (रा. इर्ले), सतिश भागवत शिंदे (रा .इर्ले), कृष्णा कदम (रा. नारी), संदिप विठ्ठल गायकवाड (रा. इर्ले), पंडित भारत पाटील (रा .यावली , गणेश रामहरी उकरंडे रा .या यावली यांचे विरुद्ध गुन्हा दमदाटी , शिवीगाळ , धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा व वाळू या गौण खनिजाचे उत्खनन व चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन-चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले.

याघटनेसंदर्भात पोलिस हेड कॉस्टेबल अनिरुध्द देशमुख वैराग पोलिस ठाणे व पोलिस कॉस्टेबल अमोल जाधव विशेष पथक सोलापूर ग्रामीण यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे. या विशेष पथकात  पोलिस हेड कॉस्टेबल मनोहर माने , पोलिस हेड कॉस्टेबल अंकुश मोरे , पोलिस अमृत रोहिदास खेडकर , पोलिस कॉस्टेबल अभिजित ठाणेकर , पोलिस कॉस्टेबल पांडुरंग केंद्रे , पोलिस कॉस्टेबल अनुप दळवी , पोलिस कॉस्टेबल विलास पारधी , पोलिस कॉस्टेबल अक्षय दळवी , पोलिस कॉस्टेबल गणेश शिंदे, चालक पोलिस कॉस्टेबल बालाजी नागरगोजे , चालक पोलिस कॉस्टेबल विष्णू बडे तसेच सहायक पोलिस निरीक्षक संदिप धांडे व दंगल नियंत्रक पथक क्रमांक ५ मधील कर्मचारी यांचा समावेश होता.