Wed, Jun 03, 2020 05:56होमपेज › Solapur › पुळूजवाडी येथे मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस अटक

पुळूजवाडी येथे मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस अटक

Published On: May 15 2019 7:59PM | Last Updated: May 15 2019 7:59PM
पंढरपूर : प्रतिनिधी

आई-वडील घरी नसल्याची संधी साधून गावातीलच एका तरुणाने पेरु खायाला देण्याचे अमिष दाखवून उसाच्या फडात नेवून मतीमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुळूजवाडी (ता.पंढरपूर) येथे घडली आहे. 

याबाबत तालूका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मुलीचे वडील कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर आई मजुरीने बाहेर कामाला गेली होती. नेमकी हिच संधी साधून गावातीलच आबा रामचंद्र मदने याने सकाळी 10.30 ते 3.30 च्या दरम्यान पीडितेला पेरु खायाला देण्याचे अमिष दाखवून तिला शेजारील उसाच्या फडात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. दुपारी साडेतीन वाजता पीडितेची आई घरी आली असता ती रडत बसलेली दिसली. आईने विचारपूर केली असता तिने आबा मदने याने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगीतले. घटनेची माहिती मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना दिल्यानंतर पंढरपूर तालूका पोलिसात आबा मदने विरोधात तक्राद दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेनंतर आबा मदने हा पळून गेला होता. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक वसगडे, पोलिस नाईक आर्किले, पोलिस कॉन्स्‍टेबल थोरात यांनी आरोपीला शिताफीने पकडून न्यालयालयापुढे हजर केले. न्यायालंयाने त्याला १७ मेपर्यंत  पोलिस कोठडी सुनावली आहे.