Fri, Jan 24, 2020 05:02
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › जीप झाडावर आदळून एक भाविक ठार, ६ जण जखमी

जीप झाडावर आदळून एक भाविक ठार, ६ जण जखमी

Published On: May 15 2019 7:51PM | Last Updated: May 15 2019 7:51PM
पंढरपूर : प्रतिनिधी

मोहिनी एकादशीला पंढरीत श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता येत असलेल्या भाविकांची जीप गाडी चालकाचा ताबा सुटल्याने जीन रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. या अपघातात लालाभाऊ धोंडीबा शिंदे या भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार दि. 15 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आष्टी (जि.. बीड) येथून भाविक पंढरपूरला  एकादशीसाठी येत होते. यावेळी चालक किसन सखाराम गायकवाड  यांना झोप आल्याने स्कार्पिओ गाडीने (एम.एच.23 वाय 0551) रोडच्या बाजुला जाऊन चिंचेच्या तोडलेल्या खोडाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत  जीपमधील लालाभाऊ धोंडीबा शिंदे (वय 65 रा. खाकळवाडी (ता.आष्टी, जि. बीड ) हे जागीच झाले. तर भाऊसाहेब रामभाऊ सोनवणे, राम नाना सोनवणे, सुभाष बापू नरूडे, किसन सखाराम गायकवाड, अंकुश निवृत्ती थेटे, बळीराम सोनबा मोरे हे सहाजण भाविक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर शहरातील खासगी रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.