Wed, Jun 19, 2019 08:41होमपेज › Solapur › मंगळवेढा : रेड्डे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मंगळवेढा : रेड्डे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Published On: Oct 11 2018 11:19PM | Last Updated: Oct 11 2018 11:18PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे येथे आजाराच्या त्रासाला कंटाळून ८५ वर्षीय वृद्धाने आत्‍महत्या केली. केराप्पा आप्पा कोळेकर असे मृताचे नाव आहे. राहत्या घरात गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांनी गळफास घेतला. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत केराप्पा कोळेकर हे पॅरॅलिसिस आजाराने त्रस्‍त होते. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी घरातील छताच्या आडूला गळफास घेतला. याबाबत छाया आबा कोठे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.