Wed, Oct 24, 2018 03:42



होमपेज › Solapur › पंढरीत पोलिसांच्या कारवाई विरोधात मराठा कार्यकर्ते रस्त्यावर(Video)

पंढरीत पोलिसांच्या कारवाई विरोधात मराठा कार्यकर्ते रस्त्यावर(Video)

Published On: Aug 11 2018 1:11PM | Last Updated: Aug 11 2018 3:42PM



पंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनात एसटी बसेसवर झालेल्या दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पंढरपुरात मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून मूक आंदोलन सुरू केले आहे.

शुक्रवारी रात्री मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड आणि संतोष कवडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एसटी बसेसवर दगड फेकल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. 

या घटनेनंतर पंढरपुरातील मराठा कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांच्याकडे जाऊन अटकेच्या कारवाईबाबत विचारणा केली असता कवडे यांनी कोणतेही कारण देण्यास नकार दिला. 

मराठा समाजातील वकील पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई सुरू केल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आहे