Wed, Oct 16, 2019 10:19होमपेज › Solapur › प्रतीक शिवशरण हत्या प्रकरण : उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे तपास

प्रतीक शिवशरण हत्या प्रकरण : उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे तपास

Published On: Nov 08 2018 1:28AM | Last Updated: Nov 08 2018 1:28AMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

प्रतीक शिवशरण हत्येचा तपास मंगळवारी पोलिस निरीक्षक मोरे यांच्याकडून वरिष्ठ अधिकारी  उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे हत्या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल, अशी शक्यता नागरिकांतून वर्तवली जात असली तरी पोलिस यंत्रणेकडून या हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती कधी स्पष्ट होणार आहे. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासावरून जनहित शेतकरी संघटनेने हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

प्रतीक शिवशरण यांच्या हत्येला 12 दिवस झाले आहेत. या हत्येनंतर ज्या दिवसापासून तपास सुरू झाला. त्या दिवसापासून जो तपास झालेला आहे. त्यातून अनेक बाबी पडताळल्या जात आहेत. अख्खी दिवाळी पोलिस यंत्रणांसाठी प्रतीकच्या मारेकर्‍यांना शोधून काढण्यासाठी माचणूर येथे थांबून काढावी लागली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस यंत्रणा विविध प्रकारे तपास करीत आहेत. माचणूर येथे ऐन सणासुदीच्या दिवसात प्रतीकच्या हत्येच्या घटनेने प्रत्येक कुटुंब भयभीत झाले असून दिवाळीच्या सणावर दुःखाचे सावट आहे. ज्यांनी कोणी हा प्रकार केला आहे. त्या लोकांमुळे आज अख्या गावाला नाहक त्रास सहन करावा लागत असून निष्पाप प्रतीकची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणी केली. याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेकडून उघड होईल. मात्र शिवशरण कुटुंबीयांच्या या वेदना भरून निघणार्‍या नाहीत. दरम्यान प्रतीक शिवशरणच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांत या हत्येचा उलगडा न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे सांगितले.