Wed, Jun 19, 2019 09:06होमपेज › Solapur › सीना-माढाच्या पाण्यासाठी आज माढा बंद

सीना-माढाच्या पाण्यासाठी आज माढा बंद

Published On: Oct 12 2018 12:55AM | Last Updated: Oct 11 2018 11:09PMमाढा : तालुका प्रतिनिधी

सीना-माढा उपसासिंचन माढा योजनेचे पाणी चिंचोली व माढा परिसर भागास पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी आणि जलसंपदा विभागाच्या बेबंद कारभाराच्या निषेधार्थ  शुक्रवार, दि. 12  रोजी माढा बंदचे आयोजन केले आहे. 

यासंदर्भात माढ्याच्या उपनगराध्यक्ष मीनल साठे यांनी माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना एक निवेदन दिले आहे. निवेदनानुसार सीना-माढा उपसासिंचन योजनेच्या टेल एन्डकडील  माढा, चिंचोली व परिसरास पाणी मिळाले पाहिजे. यासाठी हा बंद पाळण्यात येणार आहे. 

सीना-माढाच्या पाण्यासाठी माढा व उपळाई बुद्रुक येथील माजी जि.प. सदस्य आनंदराव कानडे, राजाभाऊ चवरे, दत्तात्रय अंबुरे, उपळाईचे सरपंच संजय नागटिळक, संतोष गायकवाड, मल्लिकार्जुन झाडबुके यांच्यासह अनेकजणांनी उपोषण सुरू केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासनाने बेबंदशाही केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या निषेधार्थ व पाण्याच्या मागणीसाठी हा बंद पाळण्यात येणार आहे 

यावेळी बंदचे निवेदन देताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, उपनगराध्यक्षा मीनल साठे, नगरसेवक शहाजी साठे, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्‍वर, अनिता सातपुते, नगरसेविका सुप्रिया बंडगर, महिला व कल्पना जगदाळे, चंद्रकांत कांबळे, राजू साठे, आबा साठे, भैय्या साठे, शिवसेनेचे शहरप्रमुख  शंभूराजे साठे, भाजयुमोचे शहराध्यक्ष नितीन साठे, प्रतापसिंह कदम व शेतकरी उपस्थित होते.
Today's shut off To water