Sun, Apr 21, 2019 06:16होमपेज › Solapur › सोलापूर : वडवळ येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

सोलापूर : वडवळ येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

Published On: Nov 08 2018 10:56PM | Last Updated: Nov 08 2018 10:56PMमोहोळ : वार्ताहर

वडवळ (ता. मोहोळ) येथे एका ४५ ते ५० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. हि घटना आज, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर मोहोळ पोलिसात यांची नोंद करण्यात आली आहे.

वडवळ या गावात जुन्या ग्रामपंचायत कार्यालय परिसरात गुरुवारी सकाळी नऊ वाजता एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मयत इसम एका पायाने अपंग आहे. त्याच्या अंगावर चौकडा शर्ट आहे. घटनास्थळाच्या जवळच त्याची अपंग सायकल मिळून आली. मात्र त्याची ओळख निष्पन्न होईल असा कोणताच पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलीसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात मृताचे फोटो पाठवून दिले आहेत. तसेच सोशल मिडीयावर देखील पोस्ट करुन ओळख पटविण्याचे अवाहन केले आहे. त्याचा मृत्यु आजारपणामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.