होमपेज › Solapur › पंढरपूर पोस्टामध्ये 51 लाखांचा अपहार

पंढरपूर पोस्टामध्ये 51 लाखांचा अपहार

Published On: Nov 15 2017 1:57AM | Last Updated: Nov 14 2017 11:33PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

सरकारी सेवेत असताना खोटे हिशेब करून ग्राहकांचे टपाल जीवन विम्याचे (पी.एल.आय) हप्ते कार्यालयात न जमा करता त्या रकमेवर डल्ला मारून ग्राहक व पोस्ट खात्याची फसवणूक करण्याचा प्रकार येथील पोस्ट कार्यालयात उघडकीस आला असून, याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अमजद मुबारक शेख (रा. अकलूज, ता. माळशिरस) याने 19 मे 2015 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत पंढरपूर पोस्ट ऑफिस येथे नोकरी करत असताना ग्राहकांच्या विम्याचे हप्ते भरले नाहीत. व 51 लाख 72 हजार 140 रुपयांचा अपहार शेख याने केला आहे.

 याबाबतची तक्रार सहायक अधीक्षक सोमनाथ पांडुरंग काळे यांनी शहर पोलिस स्थानकात केली आहे. सदर घटना ही मागील काही महिन्यांपूर्वीच उघडकीस आली आहे. परंतु, गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेरीस ग्राहक आक्रमक झाल्यानंतर पोस्टाने तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित लिपिकास निलंबित केले आहे. याबाबतचा अधिक तपास पोसई संजय धोत्रे हे करीत आहेत.