Thu, Feb 20, 2020 07:46होमपेज › Solapur › न्यायाधीशांच्या शेतातील पिकाची चोरी; दोघांवर गुन्हा

न्यायाधीशांच्या शेतातील पिकाची चोरी

Last Updated: Oct 10 2019 1:41AM
बार्शी ः तालुका प्रतिनिधी

न्यायाधीशांच्या शेतातील मक्याचे पीक चोरून नेऊन उडदाचे पीक उपटून टाकल्याचा प्रकार तांदूळवाडी शिवारात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर पांगरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छगन गोवर्धन गरड व लक्ष्मी छगन गरड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णाथ नारायण काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जावई संतोष हणुमंत गरड न्यायाधीश पदावर कार्यरत असून  ते बाहेरगावी असतात. त्यामुळे जावयाची तांदूळवाडी येथील शेती ते मजूर लावून त्यांच्याकडून करून घेतात. काळे यांना शेतातील मजूर दत्ता धुमाळ यांनी फोन करून छगन गोवर्धन गरड व त्याची पत्नी लक्ष्मी छगन गरड यांनी अनधिकृतपणे उडीदाचे पीक उपटून फेकत आहेत तसेच मक्याचे पीक काढून घेऊन जात आहेत, असे सांगितले. काळे यांनी तातडीने शेतात जाऊन पाहणी केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.