होमपेज › Solapur › सोलापुरात तालीम वादातून एकाचा खून(व्हिडिओ)

सोलापुरात तालीम वादातून एकाचा खून(व्हिडिओ)

Published On: Jul 07 2018 11:08PM | Last Updated: Jul 08 2018 1:17AMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूरातील पत्रा तालीम कार्यकर्ता सतीश उर्फ आबा कांबळे (वय ३२, रा. पत्रा तालिम जवळ सोलापूर) याचा निर्घुण खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. शहरातील शिंदे चौकात रात्री साडेनउ वाजता ही घटना घडली. 

आबा कांबळे हे पत्रा तालिमचे कार्यकर्ते होते. नव्या पेठेजवळील मोबाइल गल्लीमध्ये त्यांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. रात्री ९:३० च्या सुमारास दुकान बंद करुन ते गाडीवर मित्रांसमवेत घरी निघाले होते. शिंदे चौक येथे आल्यावर त्यांच्या पाठीमागून १५-२० जणांचा जमाव आला व त्यांनी तीक्षण हत्यारांनी कांबळे  यांच्यावर हल्ला केला. त्यात कांबळे गंभीर जखमी होवून खाली पडले. कांबळे जमिनीवर कोसळल्‍यानंतही त्यांच्या मानेवर व चेहऱ्यावर वार करुन जमाव पसार झाला. यात कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणला त्यावेळी मोठा जमाव रुग्णालयाच्या परिसरात जमला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रुग्णालयाच्या परिसरात लावण्यात आला आहे. पाणीवेस तालीम आणि पत्रा तालीम यांच्या वैरातूनच हा खून झाल्याची चर्चा  शासकीय रुग्नालय परिसरात सुरु होती. 

याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.