Fri, Apr 26, 2019 19:47होमपेज › Solapur › आमदार भालकेंच्या घरासमोर आंदोलन 

आमदार भालकेंच्या घरासमोर आंदोलन 

Published On: Nov 08 2018 1:28AM | Last Updated: Nov 08 2018 1:28AMपंढरपूर : प्रतिनिधी

उसाची पहिली उचल जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुसर्‍या दिवशी स्वाभिमानीने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. भारत भालके यांच्या घरासमोर आंदोलन केले. 

जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही. अगोदर ऊस दर जाहीर करा, अशी मागणी करत दुसर्‍या दिवशी आ. भारत भालके यांच्या घरासमोर आंदोलन केले. 

आंदोलन सुरू असल्याचे माहिती मिळताच आ. भारत भालके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.  ऊस दरासाठी शासनाने कारखानदारांना निधी देण्याची गरज असल्याचे सांगितले. शासनाने हातभार लावला तर दरवाढ देण्यास मदत होणार आहे. याबाबत आपण शासनाकडे मागणी करत असल्याचे आ. भारत भालके यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू बागल, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, किर्तीपाल गायकवाड,  अतुल करंडे, निवास भोसले, अमर इंगळे, चंद्रकांत बागल, भाऊबली साबळे, सावता राक्षे, कांतीलाल नाईकनवरे, संतोष शेंडगे, एन.पी. बागल, अतूल फाटे, सचिन ताटे, गणेश बागल, शिवाजी सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते.

गुरुवार दि. 8 रोजी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानीच्या सुत्रांनी सांगितले.