होमपेज › Solapur › कुर्डुवाडी येथे 4 वाहनांचा अपघात

कुर्डुवाडी येथे 4 वाहनांचा अपघात

Published On: Nov 15 2017 1:57AM | Last Updated: Nov 14 2017 11:30PM

बुकमार्क करा

कुर्डुवाडी : प्रतिनिधी

कुर्डुवाडी बायपास रस्त्यावर दुचाकी, ट्रक व जीप आणि पिकअप या वाहनांच्या अपघातात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व शिक्षक राहुल भोरे (वय 41) हे जागीच ठार झाले, तर तिघेजण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

राहुल श्रीधर भोरे हे भांबुरे वस्ती (भोसरे) येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. ते संभाजी ब्रिगेडमध्येही सक्रिय कायकर्ते म्हणून परिचित होते. शाळा सुटल्यानंतर सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान ते मोटारसायकलवरून बायपास रोड येथील उड्डाणपुलावरून जात असताना ट्रक, एस.टी.बस, पिकअप यांचा जबर अपघात झाला. या अपघातात ही वाहने एकमेकांवर जोरात आदळली. या अपघातात राहुल भोरे व इतर तिघांना एस.टी. व ट्रक यांनी जोरात चेपले. त्यामुळे राहुल भोरे यांचा जागीच मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे.  राहुल भोरे यांचा कुर्डुवाडी येथे साजरी होणार्‍या शिवजयंतीमध्ये त्यांचा मोठा सहभाग असे. जि.प. माढा तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे ते माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक होते. राहुल भोरे यांच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ, बहीण व दोन मुले असा परिवार आहे.