Sat, Jul 04, 2020 03:28होमपेज › Solapur › सुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले? : प्रकाश आंबेडकर

सुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केले? : प्रकाश आंबेडकर

Published On: Mar 25 2019 12:31PM | Last Updated: Mar 25 2019 12:22PM
सोलापूर : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकरांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर प्रखर टीका केली आहे. सुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केले, असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा नातूच घटनेचा खून करण्यास निघाला आहे, अशी टीका शिंदे यांनी काल, रविवारी (दि.२४) केली होती. त्यांच्या या टीकेला आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिले. सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदेंना आव्हान दिले आहे. 

'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टानं राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत,' अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसनेच घटना बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

सुशीलकुमार शिंदेंची स्मरणशक्ती फार कमी असल्याचा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी लगावला. 'शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे. मात्र माझ्या डोक्यातील मेमरी चिप जास्त जीबीची आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात राहतात,' असेही आंबेडकर म्हणाले.