Wed, Jun 26, 2019 02:01होमपेज › Solapur › मंगळवेढ्याच्या दुष्काळी प्रश्‍नासाठी आ. परिचारक, अवताडेंनी काय केले : आ.भारत भालके

मंगळवेढ्याच्या दुष्काळी प्रश्‍नासाठी आ. परिचारक, अवताडेंनी काय केले : आ.भारत भालके

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:47PMमंगळवेढा: तालुका प्रतिनिधी

राज्यात आणि केंद्रात सत्ता भाजपा शिवसेनेची आहे, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाच्या उपसा सिंचन योजनेचा प्रश्‍न निधी अभावी प्रलंबित आहे. आ.परिचारक आणि समाधान  अवताडे हे विद्यमान सरकारच्या जवळचे आहेत तर त्यांनी गेल्या साडे तीन वर्षात या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नाचे काम जनते समोर मांडावे  असे आवाहन आ. भारत भालके यांनी मंगळवेढ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. 

यावेळी  आ.भालके यांनी सांगीतले की, भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा ही आघाडी सरकार च्या काळात मंजूर झाल्यानंतर लगेच निधिच्या 75 टक्के रक्कम कामासाठी दिली. मात्र सत्ता बदलापासून उर्वरित रक्कम देण्यास सत्ताधारी मंडळी दुजाभाव करत असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील कारखाना रस्त्याच्या कामाचे श्रेय जर कोण घेत असेल जरूर घ्या पण कामाला शिफारस आम्ही केल्याचे तर नाकारु नका असे सांगीतले.आपण केल्या आठ वर्षात अनेक कामे केली मात्र  त्याचा डांगोरा पिटला नसल्याचे सांगत आ.भालके पुढे म्हणाले की, जनता हुशार आहे कामाचा कोण आहे, नावाचा कोण आहे हे ओळखते. विधिमंडळात अनेकदा तालुक्याचा प्रश्‍नावर आवाज उठावला असुन निवडणुका आल्या 35 की  गावच्या प्रश्‍नावर लोकात दिशाभूल करायची . माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍या मंडळीनी तीन वर्षात आषाढ़ीवारी  सह कारखाना कार्यक्रमात आलेल्या मुख्यमंत्र्यांना तालुक्याच्या पाणी प्रश्‍ना संबंधी किती वेळा मागणी केली याचा खुलासा करावा असेही आवाहन केले.

आपण या प्रश्‍नी उच्च न्यायालयात दाद मागितली असुन मुख्य सचिवाना न्यायलायांने फटकारले आहे. एक फेब्रुवारी रोजी याबाबत निर्णय अपेक्षित आहे. या कामी दुष्काळी भागातील लोक प्रयत्नशील आहेत . या न्यायालयीन लढाईचा खर्च मी स्वीकारला असुन न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. म्हैसाळ योजनेसाठी बैठकीत कोण बोलले हे सगळ्यांना माहीत आहे.