Wed, Jun 19, 2019 08:18होमपेज › Solapur › दुष्काळी भागात शैला गोडसे यांची संपर्क मोहीम

दुष्काळी भागात शैला गोडसे यांची संपर्क मोहीम

Published On: Oct 12 2018 8:43PM | Last Updated: Oct 12 2018 8:43PMरड्डे : वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपली व्यूहरचना आखत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आताच रान पेटले असल्याचे चित्र या भागातील मतदारांना पहायला मिळत आहे. या मतदारसंघातून अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून त्यांनी आपापल्यापरीने गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून काही जणांनी गावभेट दौरा चालू केला आहे.
या मतदारसंघातून आता नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या जिल्हा परिषद सदस्या सौ. शैला गोडसे या शिवसेनेचे शिवधनुष्य घेऊन मैदानात उतरणार असून त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील काही भागात गावभेट दौर्‍याला सुरवात केली आहे. गुरूवारी त्यांनी रड्डे येथील नागरिकांशी संवाद साधला.

या मतदारसंघातील कोणत्याही नेत्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना आणि मंगळवेढा उपसा सिंचन  योजनेबद्दल खूली चर्चा करावी असे आव्हान दिले.  त्यांनी या भागातील नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्या प्रत्येक गावातील मंडळांना भेटी देऊन त्या मंडळातील कार्यकर्ते यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.  मी आतापर्यंत  पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. परंतु त्यावेळी मला पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मी कुरूल  जिल्हा परिषद गटातून निवडून आले असल्याचे सांगितले.    

यावेळी रड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, गुलाब थोरबोले, रोहिदास कांबळे, युवराज कांबळे, मोहन सांगोलकर, सचिन कांबळे यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.