Mon, Sep 16, 2019 05:37होमपेज › Solapur › पंढरपुरात देशी कट्ट्यासह दोघांना अटक

पंढरपुरात देशी कट्ट्यासह दोघांना अटक

Published On: May 06 2019 6:33PM | Last Updated: May 06 2019 6:33PM
पंढरपुर : प्रतिनिधी

 विक्रीसाठी आणलेल्या देशी कट्टयासह दोन युवकांना पंढरपूर शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. 

पंढरपूर येथील हॉटेल अमरजवळ देशी कट्टा विक्रीसाठी घेवून काही लोक येणार असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (५ मे) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रवीण बाळासाहेब शेळके (वय २८, कोन्हेरी, ता. मोहोळ) आणि तात्या लक्ष्मण जाधव (वय २८, पेनूर, ता. मोहोळ) या दोघांना ताब्यात घेतले. 

यावेळी प्रवीण शेळके याच्या कमरेला असलेला देशी कट्टा ताब्यात घेण्यात आला. तसेच दोघांकडील मोटारसायकल, मोबाईल असा ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला.