Wed, May 27, 2020 11:51होमपेज › Solapur › गोपाळपूर येथे पिकअपची धडक : सख्ख्या भावांचा मृत्यू

गोपाळपूर येथे पिकअपची धडक : सख्ख्या भावांचा मृत्यू

Last Updated: May 23 2020 1:44AM
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. 22 रोजी पहाटे घडली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील युवक विजय बाळू गुरव (वय 22) व प्रथमेश बाळू गुरव (16) या दोन सख्ख्या भावांचा  पहाटे व्यायामासाठी गेल्यानंतर पिकअपने (एम. एच. 42, एक्यू 4923)  दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघानांही तातडीने उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, परिस्थिती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला हलविण्यात आले होते. मात्र, वाटेतच त्या दोघांचा मृत्यू झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत पोलिस भरती होण्याच्या जिद्दीने ते व्यायाम व अभ्यास करत होते. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे गुरव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.