Fri, Sep 20, 2019 22:18होमपेज › Solapur › गटविकास अधिकाऱ्या विरोधात मारहाणीचा आरोप 

गटविकास अधिकाऱ्या विरोधात मारहाणीचा आरोप 

Published On: May 09 2018 6:30PM | Last Updated: May 09 2018 6:29PMमंगळवेढा : प्रतिनिधी

गटविकास अधिकाऱ्यानेच ग्रामसेवकास मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारापुरचे ग्रामसेवक एम. पी. मड्डे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. मंगळवेढा तालुका गट विकास अधिकारी आर. आर. जाधव यांनी आपल्या खासगी गाडीत बसवून सोलापुर मंगळवेढा रस्त्यावरील तीऱ्हे गावजवळ शिवारात मड्डे यांना मारहाण केली असल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मड्डे हे मारापुर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. मारापुर ग्रामस्थानी मड्डे यांच्या विरोधात पैशाशिवाय काम करत नाहीत अशी  बीडीओ कडे तक्रार केली होती. गटविकास अधिकारी आर. आर. जाधव यांनी याची कोणतीही शहानिशा न करता मड्डे याना जोरदार मारहाण केली असल्याचा मड्डे यांनी केला आहे. 

पोठाचा त्रास असल्याचे माहिती असुन देखील पोठात लाथा बुक्क्या मारल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे यावर  ग्रामसेवक यूनियन संघटना आक्रमक झाली असुन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड़ यांच्या कड़े गट विकास अधिकारी आर आर जाधव यांच्या वर कारवाई करुन गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.