Sat, Sep 21, 2019 06:29होमपेज › Solapur › माढ्यात मोहिते विरुद्ध मोहिते सामन्याची शक्यता

माढ्यात मोहिते विरुद्ध मोहिते सामन्याची शक्यता

Published On: Mar 21 2019 12:51AM | Last Updated: Mar 21 2019 12:51AM
नातेपुते : प्रतिनिधी

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदललं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्यातून रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी दुसऱ्या मोहितेंना मैदानात उतरविण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता. धवलसिंह मोहिते पाटील हे सध्या शिवसेनेत आहेत. त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व जयंत पाटील यांची भेट घेतली आणि एक तास बंद दाराआड चर्चा केली.

त्यामुळे धवलसिंह हे राष्ट्रवादीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रणजितसिंह यांच्या विरोधात धवससिंहांना उमेदवारी दिल्यास मोहिते घराण्याचे पारंपरिक मतदार फुटण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. असं झालं तर माढ्यात तुंबळ राजकीय लढाई रंगण्याची शक्यता आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्येप्रवेश केला. या प्रवेशाने राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवातही केली होती. देशमुख हे शरद पवारांचे विश्वासू समजले जातात. मात्र नव्या समिकरणांमुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांना डावलले गेले अर्थातच नाराज होऊन भाजपचा घरोबा जवळ केला व वेगळा निर्णय घेतला आहे,