Tue, Dec 10, 2019 13:45होमपेज › Solapur › पावसासाठी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना साकडे

पावसासाठी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना साकडे

Published On: Jul 22 2019 1:35PM | Last Updated: Jul 22 2019 1:35PM
सोलापूर : प्रतिनिधी

पावसाळ्याच्या महिना उलटून गेला तरीही म्हणावा तसा पाऊस पडत नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जनता हवालदिल झाली आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. या नैसर्गिक संकटापासून मुक्तता होऊन मुबलक पाऊस पडावा आणि मुक्या जनावरांसह बळीराजाची दुष्टचक्रातून मुक्तता व्हावी म्हणून सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना संभाजी आरमारच्या वतीने साकडे घालण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्‍यात आली. 

दुष्‍काळामुळे शेतातली जनावरे कशी जगवावीत या विवंचनेने शेतकऱ्याची झोप उडाली आहे. बळीराजा अडचणीत आला आहे. कर्जाच्या वाढत्या बोजामुळे शेतकरी कुटुंबाची दैना उडालेली आहे. शहरी भागातही ८ दिवसाआड पाणी पुरवठा होत असून पावसाने जर अशीच ओढ दिली तर यापुढील काळात भयाण परिस्थिती ओढवणार आहे.